आठवणीतली  दिवाळी


नवरात्र सरल की वेध लागतात ते दिवाळीचे . दिवाळी येणार म्हणून काय काय करायचय याच्या यादया  तयार व्हायला लागतात,सर्वात आधी ठरत घर कस सारवायच (म्हणजे घराला रंग कोणता लावयाचा. आजकाल सारवत नाही कोनी,एकदा दिलेला रंग 5 वर्ष तरि पुरतो),घरासाठी काही खरेदी करायची का,कारण तशी खरेदी एकदाच तर व्हायची दिवाळीत.नंतर किरान्याची यादी व्हायची. फराळाच करनं हा सर्वात महत्वाचा आणि मुख्य कार्यक्रम  पन लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय फराळाच काहीच खायच नाही हे ठरलेल (कदाचित त्यामुळेच वाट पाहन्याची वृत्ति,सहनशीलता आली असावी),पूजन झाल्यावर मात्र मनसोक्त ताव मारायची मज्जा काही औरच! या सर्व धूमधामीत सर्वात आनंददायीं म्हणजे कपड्याची खरेदी तो पूर्ण आपला निर्णय असायचा आई पप्पाचा नाही( वर्षातुन एकदाच तर घेता येत होते मनासारखे नविन कपडे) ,फटाके मात्र दसऱ्या नंतर लगेच खरेदी करायचो काकांसोबत जाउन. थोड़े स्वस्त मिळायचे आणि गर्दी पन कमी रहात होती. सर्वात जास्त आनंद व्हायचा शाळेला सुट्टी लागली की. दिवाळीच्या दिवशी पहाटे ताइच्या हाताने उटनं लाउन आंघोळ करायची, ठंडीत कुड़कुडत मंदिरात जायच आणि फटाके फोड़ायला सकाळीच सुरवात करायची आधी सूतळी बॉम्ब, मग हा ,मग तो सगळ ठरवून पुरवुन करायचं,वेगळीच मज्जा! 
आता घर सोडून मुंबई ला आलो.. सगळच बदलल! 
दिवाळी मात्र घरीच साजरी होणार तेव्हड्याच आनंदात !
पण राहून राहून वाटतं.. 
लहान पण देगा देवा...

Comments

  1. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  2. छान हं गुड्डू

    ReplyDelete

Post a Comment